महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

भारताच्या रस्त्यावर दिसतात गायी, म्हशी; या दिग्गज क्रिकेटपूटच्या ट्विटवर फॅन्स भडकले - michael vaughan

वॉनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, भारत दौऱयात मला रस्त्यावर फिरताना खूप मजा येत आहे. आजच्या सकाळचीच घटना होती की, मी येथील रस्त्यांवर गायी, उंट, बकऱ्या आणि म्हशी पाहिल्या.

मायकल वॉन

By

Published : Apr 10, 2019, 8:53 PM IST

मुंबई - इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन सध्या भारतात आयपीएलमध्ये समालोचकाच्या भूमिकेत पाहायला मिळतो. आयपीएलमुळे त्याला भारताच्या विविध शहरात फिरायला मिळत आहे. तो सोशल मीडियावर सतत अॅक्टीव राहतो. नुकतेच त्याने एक ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटवर भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत.

वॉनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, भारत दौऱयात मला रस्त्यावर फिरताना खूप मजा येत आहे. आजच्या सकाळचीच घटना होती की, मी येथील रस्त्यांवर गायी, उंट, बकऱ्या आणि म्हशी पाहिल्या.

गंमत म्हणून वॉनने हे ट्वीट केले आहे. पण ते भारतीय फॅन्सला आवडलेले नाही. भारतीय फॅन्सनी रीट्विट करून त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. फॅन्सनी त्याच्यावर भारताचा अपमाण केल्याचा आरोप लावला आहे. काही लोकांनी त्याचे समर्थनही केले. मायकल वॉनने त्याच्या भारत दौऱ्यातील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्याची सूचना केली होती. त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, भारत जर समजूतदार असेल, तर विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला आराम द्यावा. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी विश्रांती महत्वाची आहे. वॉनच्या या ट्वीटचे अनेकांनी समर्थनही केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details