पुणे - आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचखोरी प्रकरणी अटक केली आहे. प्रशांत सुरेश भुजबळ (वय 30 ) आणि कृष्णदेव सुभाष पाबळे (वय 32)अशी लाचखोर पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.या दोघांनीही क्रिकेट बेटिंग करणाऱ्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेतली होती.
मंचरचे दोन पोलीस गजाआड; क्रिकेट बेटिंग करणाऱ्याकडून घेतली लाच! - मंचर पोलीस न्यूज
क्रिकेट बेटिंग करणाऱ्याकडून लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी मंचर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. या दोघांनीही क्रिकेट बेटिंग करणाऱ्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेतली होती.
दोन महिन्यांपूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथील एक सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस हवालदार तर, राजगुरुनगर येथील पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाची खाकीवर्दी मलीन होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशाचप्रकारे क्रिकेट बेटिंग चालविणाऱ्याला 30 सप्टेंबरला मंचर पोलीसांकडून पकडण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याकडून 50 हजार रुपये घेऊन त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर देखील त्याला बेटिंग सुरू ठेवण्यासाठी भुजबळ आणि पाबळे यांनी 1 ऑक्टोबरला त्याच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. 2 ऑक्टोबरला 20 हजार रुपयांची लाच घेताना पाबळे आणि भुजबळ दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.