विशाखापट्टणम - आयपीएलच्या १२ व्या मौसमातील एलिमिनेट सामन्यात काही अविस्मरणीय घटना घडल्या. अमित मिश्रा आणि दीपक हुड्डाचे बाद होणे असेल किंवा काल खलील अहमदची विकेट घेतल्यानंतरची रिअॅक्शन. सारे काही लक्ष वेधून घेणारे होते. त्या घटनांपैकी खलील अहमदची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.
अय्यरला बाद केल्यानंतर खलील अहमदने केला 'असा' इशारा - खलील अहमद
यंदाच्या आयपीएल मौसमात खलीलने आपल्या धारदार गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. त्याने एकूण १९ गडी बाद केले आहेत.
या सामन्यात श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर खलील अहमद वेगळ्याच पद्धतीने जल्लोष करताना दिसून आला. खलीलचे, अशा पद्धतीने सेलीब्रेशन करण्याचे कारण काय, हे मात्र अद्याप कुणालाच कळले नाही. अय्यरला बाद केल्यानंतर हातात मोबाईल फोन आहे, असे समजून बटण दाबून फोन वर बोलत असल्याची रिअॅक्शन करत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यंदाच्या आयपीएल मौसमात खलीलने आपल्या धारदार गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. त्याने एकूण १९ गडी बाद केले आहेत. काल दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही त्याने २ गडी बाद केले होते. दिल्लीने हा सामना २ गडी राखून जिंकला.
TAGGED:
खलील अहमद