महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

IPL Eliminator DC vs SRH: पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी दिल्ली लावणार बाजी, पराभूत संघ जाणार बाहेर - undefined

मुंबई इंडियन्सने कोलकात्याला ९ गड्यांनी मात देत हैदराबादला प्लेऑफमध्ये आणले. हैदराबादने १४ सामन्यात ६ विजय मिळविले.

दिल्ली-हैदराबाद

By

Published : May 8, 2019, 12:10 PM IST

Updated : May 8, 2019, 12:32 PM IST

दिल्ली- आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणार दिल्लीचा संघ बुधवारी नशीबाने प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या हैदराबादशी भिडणार आहे. मात्र, या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.


दिल्ली आयपीएलच्या १२ व्या सत्रात अनेक चेहरे बदलून नव्या टीमसह मैदानात उतरली आहे. २०१३ नंतर सतत गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहणाऱ्या दिल्लीने यंदा दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी १४ सामन्यात ९ सामन्यात विजय मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. एकवेळ हा संघ टॉपवर दिसून आला. पण हे स्थानावर त्यांचे सातत्य नव्हते.


दुसरीकडे मुंबई इंडियन्सने कोलकाताला ९ गड्यांनी मात देत हैदराबादला प्लेऑफमध्ये आणले. हैदराबादने १४ सामन्यात ६ विजय मिळविले. हैदराबादच्या संघाला नशीबाची साथ मिळाली आहे. जे शेवटच्या सामन्यात खराब पराभवाला सामोरे जावे लागले असतानाही त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळविले. आता एलिमिनेटर मध्ये पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.


दिल्ली फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये हा संघ संतुलित वाटत आहे. शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्याकडून संघाला खूप अपेक्षा आहे. पंतने मागील सामन्यात नाबाद ५३ धावा केल्या होत्या. अमित मिश्रा तुफान फॉर्मात आहे. त्याच्या जादुई फिरकी गोलंदाजीमुळे राजस्थानच्या संघ ११५ धावांवर सर्वबाद झाला. रबाडा बाहेर पडताच गोलंदाजीत मिश्रा, अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांनी धारदार गोलंदाजी केली आहे.


दुसरीकडे हैदराबादच्या संघाला डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयअस्टो यांची कमतरता जाणवत आहे. मध्यक्रमात मनीष पांडे, केन विलियमसन,ऋध्दिमान साहा, विजय शंकर यांच्यावर जबाबदारी असेल. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, खलील अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले आहेत. हैदरबादला हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

Last Updated : May 8, 2019, 12:32 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details