मुंबई - खासदारपद गेल्यावर मला दिल्लीच्या शासकीय बंगल्याबाहेर काँग्रेसने काढले होते. त्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केले. दक्षिण मध्य मुंबईचे युतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिपाइंच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मला दिल्लीच्या बंगल्यातून बाहेर काढणाऱ्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढणार - रामदास आठवले
मला आधीच लागली होती चाहूल, दक्षिण मध्य मुंबईचे तिकीट मिळविणार राहुर अशा खास आठवले शैलीतल्या कवितेने रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाल सुरुवात केली. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.
मला आधीच लागली होती चाहूल, दक्षिण मध्य मुंबईचे तिकीट मिळविणार राहुर अशा खास आठवले शैलीतल्या कवितेने रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाल सुरुवात केली. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. आठवले म्हणाले, की काँग्रेसचे नेते खासदारपद गेल्यावरही दोन दोन वर्षे बंगला सोडत नाहीत. पण, माझे सामान त्यांनी बाहेर काढले. मी त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करणार होतो. पण, सोडून दिले. आता या काँग्रेसचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
यावेळी आठवलेंनी आणि शेवाळेंनी एकमेकांना केक भरवत शुभेच्छा दिल्या. शेवाळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासह शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, आमदार तुकाराम काते, आरपीआय नेते अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे पदाधिकारी राजेश शिरवाडकर, समाजसेवक बी आर शेट्टी आणि इतर नेते उपस्थित होते.