बेळगाव (कर्नाटक) - जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आणि सामुहिक प्रसार झालेले हिरेबागेवाडी गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. या गावातील लोकांनी फटाके फोडून याचा आनंद साजरा केला.
बेळगाव जिल्ह्यातील 'हे' गाव अखेर कोरोनामुक्त
3 एप्रिलला या गावात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. या गावात पहिला रूग्ण सापडल्यानंतर गावातील रूग्णांची संख्या ही 48 वर गेली होती. तेव्हा पासून हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.
3 एप्रिलला या गावात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. या गावात पहिला रूग्ण सापडल्यानंतर गावातील रूग्णांची संख्या ही 48 वर गेली होती. तेव्हा पासून हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. 6 जूनपर्यंत हे संपूर्ण गाव सील करण्यात आले होते. गेल्या 28 दिवसांपासून गावात कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळला नसल्याने गावातील संचारबंदी हटविण्यात आली आहे. गावातील संचारबंदी हटविल्यामुळे जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. गावातील सर्व दुकाने उघडून त्यांचे निर्जंतूकीकरण करण्यात येत असून नागरिकही सामाजीक अंतर राखत आहेत.