आंध्रप्रदेश - भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी याने होमटाउन हनमकोंडा वारंगळ येथे त्याची मैत्रिण फॅशन डिजायनर प्रिती राजसोबत विवाह केला. रविवारी हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास काही क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
हनुमाने २३ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे प्रिती राजसोबत साखरपुडा केला होता. एस.श्रीधर यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. या विवाह सोहळ्यास दीड हजारपेक्षा जास्त पाहुणे मंडळी उपस्थित होते.