महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

गडचिरोली : जिल्ह्यात 586 नविन कोरोनाबाधितांची नोंद तर 18 मृत्यू - गडचिरोली कोरोना अपडेट 6 मे 2021

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 23,598 तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 18,535 वर पोहोचली आहे. तसेच सध्या 4580 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट

By

Published : May 7, 2021, 11:39 AM IST

गडचिरोली -जिल्ह्यात गुरुवारी 586 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर 251 जणांनी कोरोनावर मात केली. तर याबरोबरच 18 बाधितांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 23,598 तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 18,535 वर पोहोचली आहे. तसेच सध्या 4580 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 483 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 18 बाधितांचा मृत्यू झाला. यात 61 वर्षीय पुरुष आरमोरी, 55 वर्षीय महिला कुनघाडा ता.चामोर्शी , 70 वर्षीय पुरुष पारडी गडचिरोली , 66 वर्षीय पुरुष बेडगाव ता.कोरची, 57 वर्षीय महिला मीचगाव ता.धानोरा , 44 वर्षीय पुरुष बोधलबंद ता.कोरची, 53 वर्षीय पुरुष चामोर्शी, 42 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 56 वर्षीय महिला डोंगरतामशी ता.आरमोरी, 58 वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, 52 वर्षीय पुरुष शिरपूर ता.कुरखेडा, 67 वर्षीय पुरुष आरमोरी, 78 वर्षीय महिला वडसा, 65 वर्षीय पुरुष खुदीरामपल्ली ता.मुलचेरा, 67 वर्षीय महिला ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 59 वर्षीय पुरुष आरमोरी, 53 वर्षीय पुरुष गिलगाव ता.चामोर्शी, 45 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.54 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 19.41 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के आहे.

नवीन 586 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 211, अहेरी तालुक्यातील 67, आरमोरी 32, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 37, धानोरा तालुक्यातील 19, एटापल्ली तालुक्यातील 44, कोरची तालुक्यातील 17, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 28, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 32 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 71 जणांचा समावेश आहे.

तर कोरोनामुक्त झालेल्या 251 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 160, अहेरी 109, आरमोरी 23, भामरागड 8, चामोर्शी 14, धानोरा 07, एटापल्ली 1, मुलचेरा 3, सिरोंचा 11, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details