महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आळंदीत कोरोनाचा पहिला बळी, दोन दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्याबाबत अनिश्चितता

कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पायी पालखी सोहळा रद्द करून मोजक्याच वारकऱ्यांसमवेत माऊलींच्या पादुका बस किंवा हेलिकॉप्टरने दशमीच्या दिवशी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र, या पालखी सोहळ्याबाबत अद्यापही प्रशासनाकडून कुठल्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

By

Published : Jun 11, 2020, 7:05 AM IST

आळंदी कोरोना न्यूज
आळंदी कोरोना न्यूज

पुणे - आषाढी वारी सोहळा दोन दिवसांवर आला असून शासनाकडून वारी सोहळ्याबाबत अद्यापही कुठलीच सूचना व परवानगी दिली गेलेली नाही. त्यातच आज आळंदीत कोरोनाचा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्याच्या तयारीला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

आळंदी कोरोना न्यूज
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पायी पालखी सोहळा रद्द करून मोजक्याच वारकऱ्यांसमवेत माऊलींच्या पादुका बस किंवा हेलिकॉप्टरने दशमीच्या दिवशी पंढरपूरला जाणार आहेत. मात्र, या पालखी सोहळ्याबाबत अद्यापही प्रशासनाकडून कुठल्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच आज कोरोनाचा पहिला बळी आळंदीत गेल्याने प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आळंदी कोरोना न्यूज
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याला पन्नास जणांसाठी परवानगी देऊन लवकरात लवकर नियमावली तयार करून द्यावी, जेणेकरून वारीच्या सोहळ्याची तयारी पूर्ण होईल, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आळंदी कोरोना न्यूज
माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्याला कोरोनाने लावला ब्रेकसंत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळ्यासाठी देशभरातून असंख्य भाविक, वारकरी आधीपासून देवाच्या आळंदी नगरीत दाखल होत असतात. टाळ-मृदुंगाचा आवाज, भजन-किर्तनाचा गजर सुरू होत असतो. अशा या भक्तीमय सोहळ्याला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. यामुळे वारकऱ्यांना या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, याची खंत अनेक वारकरी बोलून दाखवत आहेत.
आळंदी कोरोना न्यूज

ABOUT THE AUTHOR

...view details