जालना - दुष्काळ आणि सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चालू वर्षामध्येही विविध कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनामुळे राज्यात लावलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण घटले असल्याचे समोर आले आहे.
दिलासादायक : टाळेबंदीच्या काळात जालन्यात शेतकरी आत्महत्या घटल्या - तकरी आत्महत्या घटल्या jalna
एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच दुसरीकडे याच काळात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
या चालू वर्षात 1जानेवारी ते 8 जून दरम्यान एकूण 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्यांचे प्रमाण हे जानेवारी महिन्यात होते. या महिन्यात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे दहाही शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाख रुपयांची शासनाने मदत केली. त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये 4, मार्चमध्ये 4, अशा 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, एप्रिलमध्ये लॉकडाऊन सुरू झाले आणि शेतकरी आतेमहत्येचे प्रमाणही घटले. या महिन्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मे मध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर 8 जूनपर्यंत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा एकूण 23 शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केल्याची नोंद आहे. यापैकी 21 शेतकरी हे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले असून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनाने या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना केली आहे.
एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच दुसरीकडे याच काळात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांचे निर्णय घेणे बाकी असल्यामुळे या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शआसनाची मदत मिळालेली नाही. या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने मे महिन्यामध्ये आणि एकाने जूनमध्ये आत्महत्या केली आहे.