LIVE : मुंबईकरांचा सोमवार गेला 'पाण्यात'; वाहतुक खोळंबली, लोकलही धिम्यागतीने
मुंबई - पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दादर कुर्ला आणि पश्चिम उपनगरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. सकाळी देखील पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांची आणि बच्चे कंपनीची तारांबळ उडाली आहे...वाचा सविस्तर
पालघरमधील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती; आग विझवण्यास सुरुवात
पालघर - जिल्ह्यातील अल्याळी औद्योगिक क्षेत्रातील व्हिरा फार्मा कंपनीत गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. पालघर अग्निशमन दलाकडे गॅस गळती प्रतिबंधक मास्क नसल्याकारणाने ही वायू गळती थांबवणे अग्निशमन दलासाठी अडथळा निर्माण झाला होता. मात्र, थोड्या वेळात बोईसर एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ही आग व गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत....वाचा सविस्तर
नोएडात 'स्पा सेंटर'च्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; परदेशी व्यक्तींसह ३५ जणांना अटक
नोएडा- शहरातील १४ स्पा सेंटरवर पोलिसांनी धाडी टाकल्या. नोएडातील सेक्टर-१८ या भागात टाकलेल्या धाडीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी परदेशी व्यक्तींसह एकूण ३५ जणांना अटक केली आहे...वाचा सविस्तर
टिकटॉकवरील व्हिडिओचे अनुकरण करताना गळफास लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू
नागपूर- हंसपुरी भागातील १२ वर्षांय मुलीने टिकटॉकवरील गळफास घेण्याचा व्हिडिओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला. यात तिचा मृत्यू झाला. शिखा विनोद राठोड असे, या मुलीचे नाव आहे. ती इयत्ता सहावीत शिकत होती...वाचा सविस्तर
ब्रेकअपच्या चर्चांवर सुष्मिताने दिलं 'असं' उत्तर
मुंबई- सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांनी त्यांच्या नात्याविषयी कधीही जगापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघांमधील बॉन्डिंग पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी मात्र, दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एवढंच काय तर, त्यांचे ब्रेकअप झाले की काय, अशा देखील चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र, या सर्वांवर सुष्मिताने पूर्णविराम लावला आहे. तिने रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करून त्या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचे दाखवून दिले आहे....वाचा सविस्तर