अकोला - बाळापूर येथील नवीन नगर परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी केरेनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मुफ्ती, मौलाना, खासगी डॉक्टर आणि इतर नागरिकांची बैठक घेतली. कोरोना विषयी पसरणारे गैरसमज कमी होण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
बाळापुरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मौलानांसह खासगी डॉक्टरांची बैठक; सूचनांचे पालन करण्याचे आवाहन - covid 19 akola latest news
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांचे कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे, याचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी बाळापूर तालुक्यातील शेळद येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुलवाल, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी बाळापुर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, करोनाची लक्षणे आढळल्यास घरगुती उपचार न करता त्वरित रूग्णालयामध्ये जाणे, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या स्तरावरून जागृती करण्यासाठी प्रमुख मुफ्ती, मौलाना यांना आवाहन केले. त्यानंतर त्यांनी बाळापुर शहरातील खासगी वैद्यकीय डॉक्टरांना रुग्णांची नियमित तपासणी करण्यासाठी त्यांचे दवाखाने नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी सूचना दिल्या. त्यांच्याकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमीत कमी होण्यासाठी आणि नागरिकांना वेळीच उपचार होण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांचे कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच त्यांनी बाळापूर तालुक्यातील शेळद येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुलवाल, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी सोळंके, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी वाघ, पोलीस निरीक्षक शिंदे उपस्थित होते.