महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

देवेंद्र फडणवीस उद्यापासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर - nisarga cyclone raigad

निसर्ग वादळाच्या तडाख्यातून अजून कोकणी माणूस सावरला नसताना या वादळाचे राजकारण सुरू झाले आहे. राज्य सरकारने वादळ पीडितांना दिलेली 100 कोटी रुपयांची मदत तोकडी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी अगोदर ऑनलाईन पत्रकार परिषदेत निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असल्याचे सांगितले.

mumbai news
mumbai news

By

Published : Jun 10, 2020, 8:54 PM IST

मुंबई -माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरूवार पासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. राज्य सरकारने जाहिर केलेली मदत ही तोकडी आहे. तसेच राष्ट्रीय आपप्ती व्यवस्थापणाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा अधिक मदत पीडितांना दिली गेली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

फडणवीस 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. 11 जूनला ते रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी भेटी देणार आहेत. तर 12 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

निसर्ग वादळाच्या तडाख्यातून अजून कोकणी माणूस सावरला नसताना या वादळाचे राजकारण सुरू झाले आहे. राज्य सरकारने वादळ पीडितांना दिलेली 100 कोटी रुपयांची मदत तोकडी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी अगोदर ऑनलाईन पत्रकार परिषदेत निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी 100 कोटींची मदत घोषित केलेली आहे. पण ही मदत अपुरी असून राष्ट्रीय आपप्ती व्यवस्थापणाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा अधिक मदत पीडितांना दिली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय व्यवस्थापन अर्थात एनडीआरफ केंद्राच्या निकषानुसार पंचनामे करून आपली मदत देत असते. पण सांगली, कोल्हापूर , नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुराच्या वेळी एकूण दहा हजार कोटी रुपयांची मदत भाजप सरकारने केली होती. त्याचबरोबर ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना एनडीआरफचे 95 हजार रुपये तर दिलेच पण पंतप्रधान आवास योजना, रमाई अवास योजना, शबरी आवास योजनाचे लाभही दिले होते. तसेच पुरग्रस्तांना वीज पंपाच्या वसुलीला तीन महिने स्थगिती, चालू कर्ज माफ केले होते. तातडीची मदत म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरी भागात 15 हजार रुपये रोख मदत दिली होती. तसेच त्यांना धान्य ही दिले होते. एनडीआरएफ मधले पैसे खर्च करून नंतर मदत आल्यानंतर ते वळते केले होते. अश्या प्रकारचे निर्णय राज्य सरकारने घ्यावेत. एनडीआरएफच्या पलीकडे जाऊन वादळाचा तडाखा बसलेल्यांना मदत करावी, असे फडणवीस यांनी म्हटले होते. याच पार्शवभूमीवर गुरूवार पासून दोन दिवस देवेंद्र फडणवीस कोकणचा दौरा करणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या हितासाठी त्यांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details