महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नालेसफाई केली की दुसरीच सफाई हे त्यांना माहीत, देवेंद्र फडणवीसांची टीका - मुंबई नाले सफाई न्यूज

सध्या पेडर रोडवर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम अग्निशमन दल व पालिका करत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे येऊन गाड्या, इमारती आणि रस्त्याच्या नुकसानाची पाहणी केली.

देवेंद्र फडणवीसांची टीका
देवेंद्र फडणवीसांची टीका

By

Published : Aug 6, 2020, 3:29 PM IST

मुंबई -काल मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. पावसाने पेडररोडवरील हँगिंगगार्डनजवळील भिंत खचली. याची पाहणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही, महापालिका काम करते. मग पाणी कसं भरतं? नालेसफाई केली, की दुसरीच सफाई हे त्यांना माहीत, अशीदेखील टीका फडणवीस यांनी आज केली.

मुंबईत गेले ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. जनजीवन पूर्णपणे विसकळीत झालं आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी अनेक झाडेही पडली आहेत. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर, रात्री पेडर रोडवरदेखील जमीन खचली आहे. मुंबईकर साखरझोपेत असताना प्रसिद्ध असलेला पेडर रोड मुसळधार पावसाने खचला आहे. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून मातीचा ढीगही रस्त्यावर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे आणि मातीचा ढीग हटवण्यात अडथळे येत आहे.

या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत गाड्या इमारती आणि रस्ते यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ‘पालिकेचे काम कुठे अडत आहेत, हे पाहिले पाहिजे. महानगर पालिकेने 113 टक्के नाले-सफाई केली की फक्त सफाई केली, हे त्यांचे त्यांना ठाऊक. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. महापालिका काम करते. मग पाणी कसे भरते? महापालिकेने किती पंपिंग स्टेशन बसवले, कसं काम सुरू आहे याकडे गांभीर्याने लक्ष दयायला हवे,’ अशी सूचना करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कारभारावर टीकाही केली.

सध्या पेडर रोडवर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा हटवण्याचे काम अग्निशमन दल व पालिका यांच्याकडून सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचेही येथे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details