मुंबई - महेंद्र सिंह धोनी जगात सगळ्यात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याचा संघ जिंको अथवा हरो सगळ्यात जास्त चर्चा त्याचीच होते. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा विजयी रथ रोखला. सामना जरी चेन्नईने हरला तरी महेंद्र सिंह धोनीने सगळ्याची मने जिंकली. सामना हरल्यानंतर एका खास फॅनला भेटण्यासाठी धोनी ड्रेसिंग रुममधून बाहेर आला.
सामना हरला तरी धोनीने जिंकली मने ! खास फॅनला भेटण्यासाठी ड्रेसिंगरुममधून आला बाहेर - फॅन्स
या खास फॅनबरोबर एक सेल्फीही काढला. चेन्नईच्या टी-शर्टवर ऑटोग्राफही दिला. धोनीला पाहून आजी आणि तिची नात भारावून गेल्या.
सामन्याच्या दरम्यान एक वृद्ध महिला हातात पोस्टर घेऊन थांबली होती. ज्यात लिहिले होते की, मी येथे फक्त धोनीला भेटण्यासाठी आले आहे. त्या आजीबाई तिच्या नातीसोबत हा सामना पाहायला आली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी धोनीला या वृद्ध महिलेची भेट घेण्याची विनंती केली. त्यानंतर धोनी या आजीबाईला भेटण्यासाठी ड्रेसिंग रुम सोडून आले.
या खास फॅनबरोबर एक सेल्फीही काढला. चेन्नईच्या टी-शर्टवर ऑटोग्राफही दिला. धोनीला पाहून आजी आणि तिची नात भारावून गेल्या. आयपीएलच्या प्रीमियर लीगच्या ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शांत स्वभावाच्या धोनीचे लाखो चाहते जगभरात आहेत हे यापूर्वीही पाहायला मिळाले.