लाहोर - आयसीसी विश्वचषक सुरू होण्याला काही दिवसांचा अवधी उरला आहे. प्रत्येक संघ चांगली तयारी करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे क्रिकेट समीक्षक मात्र, विश्वचषक कोण जिंकणार याचे भाकीत करत आहेत. पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने भारतच यावेळी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे.
शोएबच्या मते, भारतीय संघ खूपच मजबूत आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ दोन वर्षापूर्वीच तयार झाला आहे. विश्वचषक मोठी स्पर्धा असून, ती दीर्घकाळ चालते. त्यामुळे फिटनेसचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. भारतीय गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराहवर असणार आहे.