भंडारा - शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने हलके विधान करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते भंडाऱ्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. शरद पवारांची पक्षावरील पकड ढिली पडत असल्याचे विधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे केले होते.
शरद पवारांसारख्या नेत्यांवर हलके विधान करु नये, मोदींच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया - PATEL
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे भारतीय जनता पक्षाची प्रचारसभा घेतली. यात त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसवरची पकड ढिली होत आहे. अजित पवार यांच्याकडून पक्ष हायजॅक केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथे भारतीय जनता पक्षाची प्रचारसभा घेतली. यात त्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसवरची पकड ढिली होत आहे. अजित पवार यांच्याकडून पक्ष हायजॅक केला जात आहे. पवारांना याची जाणीव आधीच झाली होती. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, असे मोदी म्हणाले होते.
यावर प्रतिक्रिया देतान पटेल म्हणाले, की शरद पवार हे गेल्या ५५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत ते १४ ते १५ निवडणुका लढले आहेत आणि जिंकले आहेत. त्यामुळे अशा मोठ्या नेत्याबद्दल दुसऱ्या एका मोठ्या नेत्याने इतके हलके विधान करणे योग्य नाही. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पवारांवरील या विधानाचा याआधीच समाचार घेण्यात आला होता.