मुंबई -लोकलमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून आता लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सकाळी व सायंकाळी गर्दीचा सामना करावा लागत होता तो आता कमी होणार आहे. मध्य रेल्वेने आजपासून आणखी 68 लोकल फेऱ्या अधिक चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर मध्य रेल्वेने लोकलच्या 68 फेऱ्या वाढवल्या, वाढत्या प्रवाशांंमुळे सेवेचा विस्तार - central railway local
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने लोकलच्या 68 फेऱ्या नव्याने सुरू केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकल सेवेदरम्यान गर्दी होत असल्याने आणखी गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
१५ जूनपासून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी दिली. त्यावेळी मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालयातील काही मोजक्याच विभागांतील कर्मचारी प्रवास करत होते. या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने सुरुवातीला 355 लोकल फेऱ्या चालवल्या होत्यात. आता हळूहळू कर्मचारी संख्या वाढल्याने व केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट खाते, कस्टम, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनादेखील लोकल प्रवासाची मुभा दिल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने 68 फेऱ्या वाढवल्या आहेत. आता एकूण फेऱ्यांची संख्या 423 झाली आहे.
अतिरिक्त 68 लोकल फेऱ्या (मध्य रेलवे मार्गावर 46 तर हार्बर लाइन 22)
9 सेवा (5 डाउन आणि 4 अप) कसारा ते सीएसटी
6 सेवा (3 डाउन आणि 3 अप) कसारा-कल्याण ते ते सीएसटी
9 सेवा (4 डाउन आणि 5 अप) कर्जत ते सीएसटी
2 सेवा (1 डाउन आणि1 अप) / ठाणे-कर्जत ते सीएसटी
2 सेवा (1 डाउन आणि 1 अप)कल्याण -कर्जत ते सीएसटी
3 सेवा (2 डाउन आणि 1 अप) अंबरनाथ ते सीएसटी
5 सेवा (2 डाउन आणि 3 अप) कल्याण ते सीएसटी
4 सेवा (2 डाउन आणि 2 अप) ठाणे ते सीएसटी
6 सेवा (3 डाउन आणि 3 अप) कुर्ला ते सीएसटी
14 सेवा (8 डाउन आणि 6 अप) पनवेल ते सीएसटी
8 सेवा (3 डाउन आणि 5 अप) वाशी ते सीएसटी
एकूण 423 लोकल सेवा (मेन लाइन 329, हार्बर लाइन 92, ट्रान्स हाबर 2)
72 सेवा (37 डाउन आणि 35 अप)/ ठाणे ते सीएसटी
24 सेवा (11 डाउन आणि 13 अप) डोंबिवली ते सीएसटी
14 सेवा (7 डाउन आणि 7 अप) कुर्ला ते सीएसटी
82 सेवा (41 डाउन आणि 41 अप) कल्याण ते सीएसटी
20 सेवा (10 डाउन आणि 10 अप) टिटवालाते सीएसटी
41 सेवा (21 डाउन आणि 20 अप) कसाराते सीएसटी
45 सेवा (22 डाउन आणि 23 अप) कर्जत ते सीएसटी
24 सेवा (12 डाउन आणि 12 अप) बदलापुर ते सीएसटी
7 सेवा (4 डाउन & 3 अप) अंबरनाथ ते सीएसटी
84 सेवा (43 डाउन आणि 41 अप) पनवेल ते सीएसटी
8 सेवा (3 डाउन आणि 5 अप)वाशी ते सीएसटी
ट्रान्स हार्बर मार्गावर 2 सेवा (1 डाउन आणि 1 अप) वाशी ते सीएसटी
रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना विनंती केली आहे, की त्यांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना एकमेकांमधील अंतरांचे नियम पाळावेत व मास्क घालावे. महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार अनिवार्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा व्यतिरिक्त अन्य कुणीही प्रवास करू नये. या अधिक रेल्वे सेवेचे वेळापत्रक देखील लवकरात लवकर सर्वांपर्यंत सामायिक केले जात आहेत असे शिवाजी सुतार वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.