पुणे- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान कळसकर याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. मी आणि सचिन अंदुरेनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती त्याने सीबीआयला दिली आहे. सीबीआयने याबाबतचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सादर केला आहे.
दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कळसकरची कबुली, सीबीआयकडून न्यायालयात अहवाल सादर - sharad kalaskar
गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्याकीय चाचणीत सीबीआयला सांगितले.
कळसकर म्हणाला, गेल्या वर्षी जून महिन्यात मी पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे कळसकरने न्यायवैद्याकीय चाचणीत सीबीआयला सांगितले. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात कळसकरचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी सीबीआयने अटक केली होती.
फेब्रुवारी २०१९ मध्ये सीबीआयकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.