मुंबई - इंदु मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आतापर्यंत व्हायला पाहिजे होते. पण, मागच्या दोन तीन वर्षात अजिबात प्रगती झाली नाही. त्यामुळे प्रस्तावित स्मारकाला आम्ही आदरांजली वाहत आहोत असे काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.
भाजप सरकार फसवेगिरी करत आहे - एकनाथ गायकवाड - congress
अजूनही टायटल क्लिअर झाले नाही. हे सरकार फसवेगिरी करत आहे, असे गायकवाड म्हणाले.
एकनात गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्ते
गायकवाड म्हणाले, की इंदु मिलची जागा आणि काही भागावर सरकार सेझ लागू करत आहे. हे सरकार फसवे आहे. ही जागा सरकारने आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली पाहिजे. पण, गेल्या दोन तीन वर्षांपासून या कामाची प्रगती झाली नाही. अजूनही टायटल क्लिअर झाले नाही. हे सरकार फसवेगिरी करत आहे, असे गायकवाड म्हणाले. समरसता हा शब्द आमच्यावर लादला जात असल्याचेही गायकवाड म्हणाले. याचा त्यांनी निषेध केला.