महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

हरियाणामध्ये 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचणीला सुरुवात; आरोग्य मंत्र्यांची माहिती.. - कोव्हॅक्सिन मानवी चाचणी हरियाणा

आज तीन लोकांना ही लस देण्यात आली. त्यांच्यावर याचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. ते या लसीला चांगला प्रतिसाद देत आहेत, असेही वीज यांनी सांगितले.

कोव्हॅक्सिन
कोव्हॅक्सिन

By

Published : Jul 17, 2020, 5:29 PM IST

चंदीगढ : रोहतकच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (पीजीआय) भारत बायोटेकने तयार केलेल्या कोरोनावरील लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी याबाबत माहिती दिली.

पीजीआय रोहतक येथे भारत बायोटेकच्या कोरोनावरील लसीची (कोव्हॅक्सिन) मानवी चाचणी आजपासून (शुक्रवार) सुरू करण्यात येत आहे. असे ट्विट करत वीज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आज तीन लोकांना ही लस देण्यात आली. त्यांच्यावर याचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. ते या लसीला चांगला प्रतिसाद देत आहेत, असेही वीज यांनी सांगितले.

भारत बायोटेकला काही दिवसांपूर्वीच कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली होती. देशात सध्या कोरोनासाठी सात वेगवेगळ्या लसींवर संशोधन सुरू आहे. त्यांपैकी दोनच लसींना मानवी चाचणीची परवानगी मिळाली आहे. कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त 'झायडस'लाही मानवी चाचणीची परवानगी मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details