पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी दिवसभरात 92 जणांना कोरोनाची लागण - pimpari chinchwad corona update
शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 330 वर पोहोचली असून चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेले दोघे वृद्ध हे लोणावळा आणि दापोडी येथील आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात मंगळवारी दिवसभरात तब्बल 92 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर 57 जण आज कोरोनामुक्त झालेले आहेत. आत्तापर्यंत 850 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 330 वर पोहोचली असून चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेले दोघे वृद्ध हे लोणावळा आणि दापोडी येथील आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.
मंगळवारी कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण हे रमाबाई नगर पिंपरी, निगडी, तापकिर नगर मोशी, प्रियदर्शनी नगर सांगवी, खराळवाडी, बौध्दनगर पिंपरी, नवभारत नगर दापोडी, अंजंठानगर आकुर्डी, पीसीएमसी बिल्डिंग निगडी, तापकिर चौक काळेवाडी, महात्माफुले नगर दापोडी, मोरवाडी रोड चिंचवड, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, धावडेवस्ती भोसरी, नढेनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, अजिंक्य नगर काळेवाडी, नवलेवस्ती चिखली, साईबाबा नगर चिंचवड, नागेश्वर नगर मोशी, नानेकरचाळ पिंपरी, चक्रपाणी वसाहत भोसरी, चिंचवडगांव, जाधवचौक दापोडी, बौध्दनगर, डि.वाय.पाटील हॉस्टेल, जयभीमनगर दापोडी, पंचतारानगर आकुर्डी, येरवडा, कोंढवा, जळगांव, खडकी येथील रहिवासी आहेत.
दत्तनगर थेरगाव, आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर, सिध्दार्थनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी, साईबाबा नगर चिंचवड, अशोकनगर पिंपरी, सद्गुरुकॉलनी वाकड, अजंठानगर आकुर्डी, भाटनगर, खंडोबामाळ भोसरी, काळेवाडी, महात्माफुलेनगर भोसरी, जुनी सांगवी, नानेकरचाळ पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी येथील रहिवासी असलेले कोविड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.