जयपूर- अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा घरच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज संघासोबत सामना सुरू आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेलाही या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, सामना सुरु होण्यासाठी अजिंक्यने आपली एक महत्वाची जबाबदारी पार पाडली.
सामन्याआधी अजिंक्य-राधिका बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये दंग - ajinkya rahane
वाढदिवसाचे फोटो राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत अजिंक्य राधिकाला केप चारत असताना दिसून येतोय.
अजिंक्य-राधिका बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये दंग
अजिंक्यची पत्नी राधिकाचा आज गुरुवारी वाढदिवस आहे. सामन्याला निघण्याआधी अजिंक्यने राधिकासोबत केक कापत, तिच्या आनंदात सहभागी झाला. वाढदिवसाचे फोटो राजस्थान रॉयल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत अजिंक्य राधिकाला केप चारत असताना दिसून येतोय.
अजिंक्यला या आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तो राजस्थानच्या संघाचे नेतृत्व करत आहे. राजस्थानच्या संघाची कामगिरीही समाधानकारक आहे.