महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अभिनेत्री दिपाली सय्यदचा सुजय विखेंना पाठिंबा, निवडून देण्याचे चाहत्यांना आवाहन - loksabha

दिपाली म्हणाल्या, की मला अनेक पक्षाकडून पाठिंब्यासाठी आग्रह केला जात होता. पण, आपण युतीचे घटक पक्ष आहोत. तसेच, सुजय विखेंची कामाची धडाडी पाहून मी हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढवण्यात मला रस नसल्याचे दिपाली म्हणाल्या.

दिपाली सय्यद

By

Published : Apr 2, 2019, 1:41 PM IST

अहमदनगर - अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली सय्यद यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विखेंना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि नागरिकांना केले. सय्यद यांनी याआधी आम आदमी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

सुजय विखे धडाडीने काम करत असल्याचे दिपाली सय्यद म्हणाल्या


दिपाली म्हणाल्या, की मला अनेक पक्षाकडून पाठिंब्यासाठी आग्रह केला जात होता. पण, आपण युतीचे घटक पक्ष आहोत. तसेच, सुजय विखेंची कामाची धडाडी पाहून मी हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढवण्यात मला रस नसल्याचे दिपाली म्हणाल्या. पण, विधानसभा निवडणूक पक्ष सांगेल त्या जागेवरुन लढण्याची आपली तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.


गेल्या काही महिन्यांपासून दिपाली सय्यद साकळाई पाणी योजना पूर्ण व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सुजय विखेंनी पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पाठिंबा देत असल्याचे सय्यद म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details