महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

एबी डिव्हिलियर्सची विश्वकरंडकात खेळण्याची इच्छा, अशी ठेवली अट - ab

दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज फलंदाजांने ११४ कसोटी आणि २२८ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधीत्व केले आहे.

डिव्हिलियर्स-धोनी

By

Published : May 19, 2019, 8:16 AM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेऊन क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या अचानक निवृत्तीने फॅन्समध्ये घोर निराशा पसरली होती. आता विश्वकरंडक तोंडावर असतानाच त्याने विश्वकरंडकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने एक अजबच अट ठेवली आहे.


एका कार्यक्रमात एबीला प्रश्न विचारण्यात आला होता, की तो २०२३ मध्ये क्रिकेट विश्वकरंडकात खेळेल का? या प्रश्नाला उत्तर देताना त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्याने एक अटही बोलून दाखवली आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, २०२३ सालचा विश्वकरंडक मी खेळेन पण त्यात महेंद्र सिंह धोनीपण खेळला पाहिजे. एबीने हे गंमतीत म्हटले असले, तरी क्रिकेटप्रेमींना या दोन दिग्गज खेळाडूंना एकत्र खेळताना पाहायला आवडेल.


दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज फलंदाजांने ११४ कसोटी आणि २२८ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधीत्व केले आहे. एबीने कसोटीत ८ हजार ७६५ तर एकदिवसीय मध्ये ९ हजार ५७७ धावा केल्या आहेत. तसेच ७८ टी-२० सामन्यात १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. यात एकूण ४७ आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे. सध्या तो जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळताना दिसून येतो. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०१९ मध्ये बंगळुरूकडून चांगली कामगिरी केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details