जळगाव - जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थांच्या सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी अद्ययावत करण्यात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्यास्थानी तर नाशिक विभागात प्रथम आला. दरम्यान जळगाव जिल्ह्यात ८७ टक्के आधार अपडेटेशनचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जून अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. अपूर्ण विद्यार्थांची आधार कार्डची माहिती अद्ययावत करण्यासंबंधी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी पत्र काढले आहे, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी दिली.
राज्यातील जिल्ह्याच्या अपडेटनुसार भंडारा जिल्ह्यात ९३.३१ टक्के नाेंद झाल्याने प्रथम तर जळगाव जिल्हा ८७.६ टक्के नोंदणी झाल्याने जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. अद्यापही जळगाव जिल्ह्यातील १३ टक्के आधार नोंदणीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे शाळेत शिकत असलेल्या व ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक स्टुडंट पोर्टलवर अपडेट केलेले नाहीत, यासह ज्यांचे आधारकार्ड काढलेले नाहीत, त्यांचे कार्ड लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर तत्काळ नोंदणी सुरू करावीत, शाळेतील सर्व विद्यार्थी आधार कार्डधारक असतील यासाठी नियोजन करावेत, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दतात्रय जगताप, माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा, विभागात प्रथम
भंडारा जिल्ह्यात ९३.३१ टक्के नाेंद झाल्याने प्रथम तर जळगाव जिल्हा ८७.६ टक्के नोंदणी झाल्याने जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.
जळगाव आधार नोंदणी
शाळा सुरू होतील म्हणून माहिती अपडेट करून आवश्यक संचमान्यता एनआयसी मार्फत तयार करून जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देतात. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरुन शाळांना संच मान्यता देण्याची कार्यवाही होते. आता दिवसांत शाळांना सुरुवात होणार असल्याने ही माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.