नाशिक- शहरात कोरोनाने थैमान घातले असून आता नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात देखील 8 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कारागृह कर्मचारी आणि कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील 8 कैद्यांना कोरोनाची लागण - Nashik road Central Jail
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील 320 न्यायाधीन कैद्यांपैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 200 कैद्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. सामान्य रुग्णालयातील पथकाने काल (ता.15) के. एन केला विद्यालयातील कैद्यांच्या तात्पुरत्या जेलला भेट देऊन तेथील 100 कैद्यांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. यात 8 आरोपींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील 320 न्यायाधीन कैद्यांपैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 200 कैद्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. सामान्य रुग्णालयातील पथकाने काल (ता.15) के.एन केला विद्यालयातील कैद्यांच्या तात्पुरत्या जेलला भेट देऊन तेथील 100 कैद्यांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. यात 8 आरोपींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तात्पुरत्या कारागृहात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कारागृह प्रशासणाने महापालिकेच्या जेल टाकी शाळेत कोरोनाबाधित कैद्यांसाठी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात नागपूर, औरंगाबाद येथील जेलमध्ये कैदी कोरोनाबाधित आढळून आले असून फक्त नाशिक रोड कारागृहात आता पर्यँत एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र आता या कारागृहातही कोरोना पोहोचला असल्याने जेल प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.