जालना- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 385 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या ही कारवाई केली असून यात 75 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाईत जालना तालुक्यातील 113 व्यक्तींकडून 24 हजार 400, बदनापुरातील 33 व्यक्तींकडून 3 हजार 700, भोकरदन येथील 125 व्यक्तींकडून 25 हजार, जाफराबाद येथील 22 व्यक्तींकडून 3 हजार 800, अंबड येथील 25 व्यक्तींकडून 7 हजार, घनसावंगी येथील 25 व्यक्तींकडून एक हजार, परतुर येथील 46 व्यक्तींकडून 8 हजार 400, तर मंठा येथील 16 व्यक्तींकडून 2 हजार 400, असे एकूण 385 व्यक्तींकडून 75 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.