नवी दिल्ली - क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपामुळे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करणे अशक्य नाही. टी-२० क्रिकेटच्या प्रकारात २०० धावा ही तशी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि अॅरोन फिंच यांनी त्याच्याजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला पण त्यांना २०० धावा करणे शक्य झाले नाही. यापूर्वी आपण एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्वीशतक ठोकलेले पाहिले आहे. मात्र, कालच्या सामन्यात विंडीजच्या एका निवृत्त क्रिकेटपटूने चक्क टी-२० सामन्यात द्वीशतक ठोकले आहे.
विंडीजच्या ४४ वर्षीय शिवनारायण चंद्रपॉलने २ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात या सामन्यात द्वीशतक ठोकले आहे. अॅडम सन्फोर्ड क्रिकेट फॉर लाईफ टी-२० मालिकेत यूएसए की मॅड डॉग्स संघाविरुध्द ७६ चेंडूत २५ चौकार आणि १३ गगनचुंबी षटकार लगावत २१० धावांची तुफानी खेळी केली. चंद्रपॉलच्या या शतकाने त्यांच्या संघाने ३०३ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात त्यांचा १९२ धावांनी विजय झाला.
आश्चर्यम! ४४ वर्षांच्या चंद्रपॉलचे टी-२० सामन्यात द्वीशतक; चौकार, षटकारांचा पाडला पाऊस - ४४ वर्षीय शिवनारायण चंद्रपॉल
चंद्रपॉल ३ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने विंडीजकडून खेळताना कसोटी सामन्यांत ११ हजार ८६७ धावा केल्या आहेत.
शिवनारायण चंद्रपॉल
चंद्रपॉल ३ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने विंडीजकडून खेळताना कसोटी सामन्यांत ११ हजार ८६७ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८ हजार ७७८ धावांची नोंद आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी त्याने केलेली ही कामगिरी पाहून अद्याप त्याच्यात क्रिकेट शिल्लक असल्याचे दिसून येते.