महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

यवतमाळात 25 जण कोरोनामुक्त, तर 14 जण कोरोनाबाधित - 14 corona positive patients yavatmal

जिल्ह्यात 150 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह होते. यात आज 14 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 164 झाला होता. मात्र 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 25 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 139 झाली आहे.

Yavatmal hospital
Yavatmal hospital

By

Published : Jul 14, 2020, 9:15 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आज 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 25 जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात आज नव्याने 14 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 8 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर 6 जण रॅपिड अॅन्टिजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 14 नागरिकांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिला आहेत. यात पुसद शहरातील संभाजी नगर येथील एक महिला, राम नगर येथील एक पुरुष, रहमत नगर येथील दोन पुरुष, शांती नगर येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक महिला, उमरखेड येथील एक महिला, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील एकविरा चौक येथील एक पुरुष, यवतमाळ येथील एक पुरुष, दिग्रस येथील दोन पुरुष आणि दारव्हा येथील एक पुरुष व एक महिला पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात 150 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह होते. यात आज 14 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 164 झाला होता. मात्र 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 25 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 139 झाली आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 476 आहे. यापैकी 324 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्यूंची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 75 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 7 हजार 199 नमुने पाठविले असून यापैकी 7 हजार 156 प्राप्त, तर 43 अहवाल अप्राप्त आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details