नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी 180 जण कोरोना बाधित आढळले आहेत तर 205 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या 180 रुग्णांमधील 59 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती, तरअँटिजेन तपासणीद्वारे 121 जण बाधित आढळले. तसेच रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53 टक्के आहे.
आजच्या एकुण 829 अहवालापैकी 611 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 632 एवढी झाली असून आतापर्यंत 13 हजार 213 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या एकुण 2 हजार 879 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
मृतांच्या अहवालात 3 ऑक्टोंबरला नांदेड कौठा येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश असून 4 ऑक्टोंबरला लेबर कॉलनी येथील 80 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, तर 5 ऑक्टोंबरला व्यंकटेशनगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा, भोकरच्या चीतगिरी येथील 84 वर्षाचा पुरुषाचा वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर अर्धापुर तालुक्यातील कामठा येथील 57 वर्षीय पुरुषाचा, नायगाव येथील 50 वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे तर 6 ऑक्टोंबरला मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील 32 वर्षीय पुरुषाचा, नांदेडच्या छत्रपती नगर येथील 60 वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 439 झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील 13, अर्धापुर कोविड केंअर सेंटर 7, लोहा कोविड केंअर सेंटर 4, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 30, विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 5, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 99, कंधार कोविड केंअर सेंटर 3, किनवट कोविड केंअर सेंटर 6, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, खाजगी रुग्णालय 23 असे 205 जणांचा समावेश आहे. तर, उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.53 टक्क्यांवर पोहोचले आहे.
मंगळवारी नोंद करण्यात आलेल्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 39, अर्धापूर तालुक्यात 1, कंधार 7, धर्माबाद 1, परभणी 3, हदगाव 1, किनवट 1, बिलोली 2, हिंगोली 3, यवतमाळ 1 असे एकुण 59 बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात56, लोहा तालुक्यात 4, हदगाव 3, माहूर 1, उमरी 13, अर्धापूर 2, मुखेड 11, नायगाव 6, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 4, किनवट 7, देगलूर 1, धर्माबाद 1, परभणी 1, मुदखेड 4, कंधार 2, बिलोली 3, यवतमाळ 1, असे एकूण 121 बाधित आढळले.
जिल्ह्यातील कोरोना संशयित व बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकुण घेतलेले स्वॅब- 87 हजार 701,