महाराष्ट्र

maharashtra

हिंगोलीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले 18 बैलांचे प्राण

By

Published : Jul 23, 2020, 10:22 PM IST

कत्तलीच्या उद्देशाने आरोपी ट्रकमधून क्र. (एमएच 40 बीपीएल 4519) 18 बैल घेऊन जात होते. दरम्यान, नांदेड ते जवळा बाजार महामार्गावरील नागेशवाडी पाटीजवळ संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये अतिशय निर्दयपणे 18 बैल भरून असल्याचे आढळले.

18 oxes saved hingoli
18 oxes saved hingoli

हिंगोली- कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ट्रकमध्ये अतिशय निर्दयपणे गोवंश ठेवण्यात आले होते. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शफी मिया (रा. परभणी), गफार इब्राहीम खान पठाण, चालक शेख इम्रान शेख अहमद, क्लिनर सय्यद अबुजर सय्यद मजहर (सर्व राहणार नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. कत्तलीच्या उद्देशाने आरोपी ट्रकमधून क्र. (एमएच 40 बीपीएल 4519) 18 बैल घेऊन जात होते. दरम्यान, नांदेड ते जवळा बाजार महामार्गावरील नागेशवाडी पाटीजवळ संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये अतिशय निर्दयपणे 18 बैल भरून असल्याचे आढळले. या बैलांसंदर्भात चालकाकडे विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी ट्रक ताब्यात घेतला व चालक क्लिनरसह ईतर 2 जणांना अटक केली.

दरम्यान, रात्री-अपरात्री गुरांची वाहतूक होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्री अपरात्री होणारी ट्रक वाहतुकीची तपासणी व्हाही, अशी मागणी गोरक्षकांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details