यवतमाळ- वैद्यकीय महाविद्यालयाला आता आणखी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 10 जण पॉझिटिव्ह तर 29 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दारव्हा येथील एक महिला, नेर येथील 2 महिला, 2 पुरुष आणि एक मुलगा, तर दिग्रस येथील 4 पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत.
यवतमाळात 10 नवे पॉझिटिव्ह; अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 62
29 निगेटिव्ह अहवालांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 11 अहवाल, दारव्हा येथील 7 आणि नेर येथील 11 अहवाल आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली आहे.
29 निगेटिव्ह अहवालांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 11 अहवाल, दारव्हा येथील 7 आणि नेर येथील 11 अहवाल आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह 225 आहे. यापैकी 156 जणांना सुट्टी देण्यात आली तर 7 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
तसेच दिग्रस येथे नव्याने पॉझिटिव्ह आलेले सर्व 4 पुरुष दारव्हा येथील सुरवातीच्या पॉझिटिव्ह महिलेच्या तर नेर येथील सर्व जण पॉझिटिव्ह सुरूवातीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तसेच वणी येथील रहिवाशी असलेले 2 जण नागपूर येथे पॉझिटिव्ह आले आहेत. ते सध्या नागपूर येथेच भरती असून प्रशासनातर्फे त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी सांगितले आहे.