महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 24 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 10  रुग्णांचा मृत्यू

शहरात आतापर्यंत 11 हजार 530 जण कोरोनामुक्त झाले असून महानगर पालिकेच्या रुग्णालयात 3 हजार 451 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Pimpri Chinchwad hospital
Pimpri Chinchwad hospital

By

Published : Jul 27, 2020, 10:17 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 1 हजार 24 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी, आढळलेले काही रुग्ण आणि मृत व्यक्ती हे ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान, 699 जण हे कोरोनामुक्त झाले असून शहरातील बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 264 वर पोहोचली आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

शहरात आतापर्यंत 11 हजार 530 जण कोरोनामुक्त झाले असून महानगर पालिकेच्या रुग्णालयात 3 हजार 451 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज मृत्यू झालेले रुग्ण हे, सांगवी (पुरुष 75 वर्षे) यमुनानगर (पुरुष 88 वर्षे) पिंपरी (पुरुष 50 वर्षे, पुरुष 48 वर्षे) भोसरी (पुरुष 26 वर्षे) मोशी (पुरुष 94 वर्षे, पुरुष 36 वर्षे) थेरगाव (पुरुष 76 वर्षे) मुळशी (पुरुष 66 वर्षे) येरवडा (स्त्री 48 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details