कोल्हापूर- शहरातील न्यू कनेरकरनगर येथील 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 9 झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, त्यामध्ये कोल्हापूर शहरातील एकही रुग्ण नव्हता. शहरातील हा पहिलाच बळी ठरला आहे.
कोल्हापुरात कोरोनाचा नववा बळी, तर आणखी 6 जणांना कोरोनाची लागण
जिल्ह्यातील एकूण 765 रुग्णांपैकी 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असतानाच 2 दिवसांपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी कनेरकरनगरमधील 62 वर्षीय सराफा व्यावसायिक कोरोनाबाधित झाला होता. मात्र, आज सकाळी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली. दरम्यान, आज दुपारी 12 वाजता प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 6 रुग्ण वाढले आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील 1, गडहिंग्लजमधील 2, शाहूवाडी तालुक्यातील 2 आणि इचलकरंजी शहरातील 1 रुग्ण वाढला आहे.