नवी दिल्ली -विकास दूबे एनकाऊंटर प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात आला होता. मात्र, यात नेमलेल्या माजी डीजीपी के.एल. गुप्ता यांच्या जागेवर दुसऱ्याला नेमावे, अशी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांची त्रिसदस्यीय चौकशी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती.
विकास दूबे एन्काऊंटर: त्रिसदस्यीय समितीमधील अधिकाऱ्यावर आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - bias in investigation
विकास दूबे एनकाऊंटर प्रकरणी समिती नेमण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्यासह तीन त्रिसदस्यीय समितीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शशीकांत अग्रवाल आणि माजी उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी केएल गुप्ता यांचा समावेश आहे.
विकास दूबे एनकाऊंटर: त्रिसदस्यीय समितीमधील माजी पोलीस अधिकाऱ्यावर आरोप; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्यासह तीन त्रिसदस्यीय समितीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शशीकांत अग्रवाल आणि माजी उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी केएल गुप्ता यांचा समावेश आहे. मात्र, वकिल अनुप प्रकाश अवस्थी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुप्ता यांच्याजागी दुसऱ्या माजी अधिकाऱ्याला नेमण्यात यावे असे म्हटले आहे. त्यांनी गुप्ता हे पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.
Last Updated : Jul 24, 2020, 5:20 PM IST