महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशाला मिळाली दुसरी स्वदेशी कोरोना लस; झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन मंजुरी

झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते.

झायडस
झायडस

By

Published : Aug 20, 2021, 9:38 PM IST

Updated : Aug 20, 2021, 10:50 PM IST

नवी दिल्ली - देशाला भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनंतर दुसरी स्वदेशी कोरोना लस मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या कोरोना लशीला भारत औषध नियंत्रकांच्या महासंचलाकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही लस 12 वर्षांहून अधिक वयोगटासाठी देण्यात येणार असल्याची माहिती जैवतंत्रज्ञान विभागाने दिली आहे.


झायडस कॅडिलाच्या लशींचे तीन डोस नागरिकांना घ्यावे लागतात. कंपनीने आपत्कालीन वापरासासाठी मंजुरी मिळण्याकरिता भारतीय औषधी नियंत्रकाकडे अर्ज केल्याचे कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे. कंपनीने दरवर्षी 10 ते 12 कोटी लशींचे उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे. झायडसने 50हून अधिक देशांमध्ये कोरोना लशींच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत.

झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन मंजुरी

हेही वाचा-सुरक्षा दलाला यश; पुलवामातील चकमकीत हिजबुलचे दोन दहशतवादी ठार

अशी आहे झायडसची लस-

झायकोव्ह-डी ही डीएनए कोव्हिड लस आहे. त्यामध्ये जेनेटिक कोड आहे. त्यामुळे लस घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकारक्षमता वाढते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकावर चाचणी करण्यात आल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माध्यमांना सांगितले होते. केंद्र सरकारच्या जैवऔषधी मोहिमेअंतर्गत जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषद व जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने ही लस विकसित करण्यात आली आहे. झायडसची लस ही 2 ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये जास्त काळ टिकते. तर 25 डिग्री सेल्सियस तापमानात कमी काळ टिकते.

हेही वाचा-2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे- सोनिया गांधी

झायडसची लस अशी करते काम-

प्लाझ्मिड डीएनए, जेव्हा यजमान पेशीमध्ये घुसवले जाते, त्याचे रूपांतर व्हायरल प्रोटिनमध्ये होते आणि मानवी प्रतिकार व्यवस्थेच्या पेशीसारख्या आणि नैसर्गिक द्रवपदार्थाच्या अशा दोन्ही बाबतीत जोरदार प्रतिकारशक्ति निर्माण करते, जी रोगापासून संरक्षण करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. झायकोव्हीडी विकसित करण्यात भारत सरकारच्या नॅशनल बायोफार्मा मिशन, बीआयआरएसी, जैवतंत्रज्ञान विभाग यांचे सहकार्य मिळालेले आहे . आतापर्यंतच्या दुर्लक्षित राहिलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, झायडस लस संशोधन कार्यक्रम, झायडस कॅडिलाच्या लस तंत्रज्ञान केंद्राकडे व्हायरल, टॉक्झॉईड, पॉलिसॅक्राईड, संयुगे आणि इतर लसी विकसित आणि उत्पादित करण्यासाठी व्यापक क्षमता आहे. प्रत्यक्षात, देशात २०१० च्या स्वाईन फ्ल्यूच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण एतद्देशीय बनावटीची लस विकसित आणि उत्पादित करणारी झायडस ही पहिली कंपनी होती.

हेही वाचा-नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ITBP चे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह 2 जवान हुतात्मा

Last Updated : Aug 20, 2021, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details