महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Youth Jump In PM Convoy : सुरक्षेत मोठी चूक; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात घुसला तरुण, पोलिसांचा हलगर्जीपणा नडला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक

Youth Jump In PM Convoy : वाराणसी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. एक तरुण त्यांच्या ताफ्यात घुसल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्याला पकडून ताब्यात घेतलं. पोलिसांच्या हलगर्जीजपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Youth Jump In PM Convoy
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 7:36 AM IST

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात घुसला तरुण

वाराणसी Youth Jump In PM Convoy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या जनतेला योजनांचं मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वावाराणसी दौऱ्यावर गेले, मात्र वाराणसी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं उघड झालं आहे. वाराणसी दौऱ्यावर असताना एक तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या ताफ्यात घसल्यानं मोठी खळबळ उडाली. रुद्राक्ष केंद्रावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळाकडं जाताना हा प्रकार घडला. हा तरुण पंतप्रधानांच्या गाडीच्या केवळ 10 फूट अंतरावर होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून ताफ्यातून बाहेर काढलं.

पोलिसांनी घेतलं तरुणाला ताब्यात :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुद्राक्ष केंद्राबाहेर आल्यानंतर विमानतळाकडं रवाना होण्यासाठी निघाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंदोबस्तात मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. मात्र मोठा बंदोबस्त तैनात असतानाही एका तरुणानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. तरुणानं पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर उडाली मारल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावरील सुरक्षा रक्षकांनी तत्काळ त्या तरुणाला ताफ्यातून पकडून बाजुला केलं. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

सैन्य भरतीची तयारी करणारा तरुण :सैन्य भरतीची तयारी करणारा हा तरुण मानसिकदृष्ट्या तणावात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हा तरुण गाझीपूरचा असून त्यानं सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र सैन्य भरतीचा निकाल न लागल्यानं तो अस्वस्थ होता. त्याला त्याचं म्हणणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. मात्र पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसल्यानं त्याला सिगरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला सिगरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून पुढील कारवाई चेतगंज कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

सुरक्षा रक्षकांवर निष्काळजीपणाचा आरोप :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात तरुण घुसल्यानं वाराणसीत मोठी खळबळ उडाली आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असती, तर ही घटना घडली नसती, असा आरोप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात तरुण घुसल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती एसपीजीला देण्यात आली आहे. एसपीजी पुढील तपास करत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Women Reservation Bill : दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक मंजूर; पंतप्रधान मोदींनी महिला खासदारांसोबत साजरा केला आनंद
  2. PM Modi Visit Varanasi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी

ABOUT THE AUTHOR

...view details