जौनपूर ( उत्तरप्रदेश ) : जिल्ह्यातील मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विजाधर्मौ गावात प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांनी झाडाला ( Jaunpur Lover Murder ) बांधले. त्यानंतर लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. या तालिबानी शिक्षेमुळे शुक्रवारी सकाळी या तरुणाचा मृत्यू ( young man life lost due to love affair ) झाला. अरविंद पाल (२२) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सकाळपासून स्थानिक पोलिस, सीओ मच्छलीशहर, एसपी देहाट यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र याबाबत बोलणे होऊ शकले ( lover death in jaunpur ) नाही.
अनेक दिवसांपासून होते प्रेमसंबंध :उल्लेखनीय आहे की, जिल्ह्यातील मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आशापूर सराफट्टू येथील रहिवासी रामकृपाल पाल यांचा मुलगा अरविंद याचे शेजारील बिजाधर माळ या गावातील एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री त्याला एक फोन आला. त्यानंतर अरविंद प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. रात्री प्रेयसीच्या नातेवाईकांना ती घराबाहेर फिरताना दिसली.