नवी दिल्ली:राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा लवकरच दिल्लीतील संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपा प्रमुख अखिलेश यादव, एनसी प्रमुख फारुख अब्दुल्ला आदी उपस्थित होते.विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक यशवंत सिन्हा लढवणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आणि मंत्री केटी रामाराव हे सोमवारी विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या नामांकन कार्यक्रमाला उपस्थित होते. इतरही नेते यावेळी उपस्थित राहिले.
यशवंत सिन्हा सकाळीच आपला अर्ज दाखल करण्यासाठी घरातून निघाले. नॉयडा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन ते अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आता अर्ज दाखल केला आहे.