महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Yamuna Expressway Accident : यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू - Many People Died On Expressway Accident

Yamuna Expressway Accident : ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण दिल्लीहून झारखंडला जात होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

Yamuna Expressway Accident
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 12:34 PM IST

नवी दिल्ली Yamuna Expressway Accident : ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा अतिवेगाचा कहर पहायला मिळालाय. एका अज्ञात वाहनानं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण दिल्लीहून झारखंडला जात होते. या गाडीत आठ जण प्रवास करत होते. तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जेवर येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

अज्ञात वाहनाची कारला धडक : पोलिसांनी सांगितलं की, यमुना एक्स्प्रेस वेच्या झिरो पॉईंटपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रबुपुरा पोलीस स्टेशन परिसरात अज्ञात वाहनानं या कारला धडक दिली. या धडकेमुळं ही कार नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. यात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्तांचे कुटुंबीय दिल्लीत राहत असल्याचं सांगण्यात येतंय. हे सर्वजण झारखंडचे रहिवासी असून हे नागरिक यमुना एक्स्प्रेस वेनं दिल्लीहून झारखंडला जात होते.

जखमींची प्रकृती चिंताजनक : मृत झालेल्या पाच जणांमध्ये उपेंद्र (३८), त्याचा भाऊ विजेंद्र (३६), बिजेंद्रची पत्नी कांती देवी (३०), बिजेंद्रची मुलगी कु ज्योती (१२) आणि सुरेश (४५) यांचा समावेश आहे. तर उपेंद्र यांचा मुलगा सूरज (16), बिजेंद्रचा मुलगा आयुष (8) आणि आर्यन (10) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर जेवर येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या पोलिसांनी पंचनामे करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

हेही वाचा :

  1. Samruddhi Mahamarg Accident : अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्रासह राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, राजकीय नेत्यांच्या वाचा प्रतिक्रिया
  2. Buldhana Accident News : खामगाव रोडवर भीषण अपघात; सासू-सासरे अन् सुनेचा अंत
  3. Nainital Bus Accident : उत्तराखंडात शाळेची बस दरीत कोसळून भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details