नवी दिल्ली :सुब्रमण्यम स्वामींच्या निवासस्थानावर Subramanian Swamy Government Residence Y श्रेणीची सुरक्षा पुरवली जाणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या वकिलांनी सांगितले की ते शनिवारपर्यंत सरकारी निवासस्थान रिकामे करतील. ते राज्यसभा सदस्य असताना त्यांना हे अधिकृत निवासस्थान देण्यात आले होते. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत निवासस्थान रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारी स्वामींच्या अर्जावर केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि खंडपीठाला सांगितले की, सुरक्षा यंत्रणाही झेड प्लस सुरक्षेअंतर्गत याचिकाकर्त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या व्यवस्थेवर समाधानी आहेत. y category security on Subramanian Swamy residence
वरिष्ठ अधिवक्ता जयंत मेहता यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात स्वामी म्हणाले होते की, सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी केंद्राने पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यानंतर सरकारने सुरक्षेबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय दिल्यानंतर याच स्वामींनी ५ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाला घर रिकामे केल्याची माहिती दिली. स्वामींची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की, त्यांना निजामुद्दीन येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात येणार आहे.