नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंशी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची बैठक पार पडली. कुस्तीपंटूसोबत झालेली चर्चा ही सकारात्मक झाली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. या घटनेप्रकरणी 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जावे, अशी मागणी पैलवानांनी केली असल्याचेही ठाकूर म्हणाले. दरम्यान पैलवानांनी या बैठकीत 5 मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये ब्रिजभूषण यांना लवकर अटक करण्याची मागणी पुन्हा केली.
सरकारला पुन्हा इशारा : केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या पैलवांनासोबत पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचा संदेश क्रीडा मंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर कुस्तीपटूंनी सरकारची ऑफर स्वीकारत क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयात भेट घेतली. पैलवानांच्यावतीने बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. कुस्तीपटू आणि प्रशिक्षक तसेच क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यामध्ये जवळपास 5 तास चर्चा झाली. यानंतर साक्षी मलिकने सांगितले की, 15 जूनपर्यंत आंगदोलन स्थगित केले जाणार आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुन्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे.