कुस्तीपटुकडून माध्यमांबाबतही प्रश्न उपस्थित चंदीगड : कुस्तीपटूंचे दिल्लीतील आंदोलन अद्यापही सुरुच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. त्यावर कुस्तीपटु साक्षी मलिकने ट्विट करत सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर कुस्तीपटु पुनियानदेखील आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
बजरंग पुनियाने म्हटले की, आम्ही आंदोलन मागे घेतल्याची अफवा पसरवली जात आहे. आंदोल मागे घेतल्याचे वृत्त खोटे आहे. देशभरातील आमच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी ही अफवा पसरविले जात आहेत. पण आम्ही सर्व एकत्रिपणे आणि खंबीरपणे लढत आहोत.काही माध्यम आणि दिल्ली पोलिसांनी आमच्या नावाने खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. काही माध्यमे आमच्या विरोधात खोट्या बातम्या दाखवत आहेत. ते अयोग्य आहे. खेळाडूंनी आंदोलन मागे घेत नोकरीवर रुजू झाल्याचे काही माध्यमांतून दाखविण्यात आले.
जोपर्यंत देशातील बहिणी व मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार आहोत- कुस्तीपटु बजंरग पुनिया
आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार :प्रत्यक्षात काहीही नसताना अशा नकारात्मक बातम्या आमच्या नावाने चालविल्या जात आहेत. आमच्या आंदोलनात कोणी अडथळे आणले तर आम्ही नोकरी सोडण्यास तयार आहोत, अशी मोठी घोषणाही कुस्तीपटु पुनियाने केली आहे. सगळे पणाला लावून ही लढाई लढत आहोत. त्यासाठी सर्व गोष्टीवर पाणी सोडले आहे. कारण हा भगिनी आणि मुलींच्या सन्मानासाठी लढा आहे.
अल्पवयीन महिला कुस्तीपटुने एफआयआर मागे घेतल्याचे वृत्त चुकीचे:साक्षी मलिकनेही ट्विट करत आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त फेटाळले होते. न्याय मिळविण्याच्या लढाईत कोणीही मागे हटणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील नोकरीची जबाबदारीही पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका, असे साक्षी मलिकने ट्विटमध्ये म्हटले आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटुने एफआयआर मागे घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्तही खोटे असल्याचे बजरंग पुनियाने ट्विट करत म्हटले आहे.
९ जुनपर्यंत सरकारला आहे अल्टीमेटम:मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांना अटक करावी, अशी कुस्तीपटुंची मागणी आहे. मात्र, सरकारने तपास सुरू असून कुस्तीपटुंना संयमाचे आवाहन केले आहे. दुसरीकडे कुस्तीपटुंचे महापंचायत आंदोलन संसद भवनाच्या उद्घाटनादिवशी पोलीस बळाचा वापर करून दडपण्यात आले. त्यानंतर कुस्तीपटुंनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारला ९ जूनपर्यंत कारवाई करण्यासाठी अल्टीमेट दिला आहे. अशा परिस्थितीत सरकारची कोंडी करण्यासाठी किसान पंचायतनेदेखील कुस्तीपटुंना पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा-
- Wrestlers Protest : साक्षी मलिकचे ट्विट - 'आंदोलन सुरूच राहणार, सर्व बातम्या खोट्या'
Wrestlers Protest: कुस्तीपटुंनी अमित शाह यांची भेट घेऊनही तोडगा नाही, 9 जूनपर्यंत सरकारला दिला आहे अल्टीमेट
Wrestler Protest Political Impact : कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसणार, सर्वेक्षण अहवालातील निष्कर्ष