हैद्राबादCricket World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023, 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी सर्वच संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. भारतीय संघ 2023 चा विश्वचषक मायदेशात खेळणार आहे. त्यामुळं चाहत्यांना ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे. टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगनं विश्वचषकाबाबत मोठं वक्तव्य केलंय. त्यानं भारतीय संघात समतोल असल्याचं म्हटलं आहे.
युवराजनं चहलबद्दल सांगितली मोठी गोष्ट : युवराज सिंग एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला की, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा समतोल चांगला आहे. 'आमच्या संघाचा कामगिरी देखील उत्तम आहे, मात्र मला वाटतं युजवेंद्र चहल संघात असायला हवा होता. कारण आपण भारतात खेळतोय. इथल्या खेळपट्ट्यांवर चेंडू खूप फिरतो. याशिवाय आमचा संघ खूपच संतुलित असल्याचं दिसतंय.
...म्हणून अश्विनची निवड :चहल किंवा सुंदरला संघात हवे होते. टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगनं सांगितलं की, भारतीय संघात युजवेंद्र चहलची कमतरता असल्याचं मला वैयक्तिकरित्या वाटतं. माझ्या मते या संघात लेगस्पिनरची कमतरता आहे. जर आपण चहलची निवड करत नसाल, तर मी वॉशिंग्टन सुंदरला संघात पाहण्यास उत्सुक होतो. पण संघाला अनुभवी गोलंदाज हवा होता, म्हणून त्यांनी आर अश्विनची निवड केली असं मला वाटतं.