महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Cup 2023: विश्वचषक २०२३: विश्वचषकात शतक झळकावणारा केएल राहुल दुसरा भारतीय यष्टीरक्षक - वल्ड कप 2023

World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये नेदरलँड्स विरुद्ध शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलनं राहुल द्रविडचा विक्रम मोडला. राहुल द्रविडनें 1999 च्या विश्वचषकात हा विक्रम केला होता.

World Cup 2023
केएल राहुल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 10:24 PM IST

बंगळुरूWorld Cup 2023: विश्वचषक 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 410 धावांची मोठी मजल मारली. (Netherlands vs India Match) नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाच्या सर्व फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. (KL Rahul) या सामन्यात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी खेळली. (Indian Cricket Team) या सामन्यात फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुलनं शतक झळकावताच त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी विश्वचषकाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा राहुल द्रविड (Cricketer Rahul Dravid) एकमेव यष्टीरक्षक फलंदाज होता.

राहुल द्रविडनं केला होता विक्रम: खरं तर, विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी शतक झळकावणारा राहुल द्रविड हा एकमेव यष्टीरक्षक होता. 1999 च्या विश्वचषकात त्यानं श्रीलंकेविरुद्ध 145 धावांची खेळी खेळली होती आणि 1999 नंतर आजपर्यंत हा विक्रम कायम होता. केएल राहुलनं भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून शतक झळकावलं आहे. तो विश्वचषकात यष्टीरक्षक म्हणून शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माचाही विक्रम मोडला: भारतीय फलंदाजापैकी राहुलनं विश्वचषकात सर्वांत जलद शतकाचा विक्रमही रचला. बंगळुरूमध्ये त्यानं नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 62 चेंडूत ही कामगिरी केली. ६२ चेंडूत शतक पूर्ण करत राहुलनं अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूत शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माचा मागील विक्रम मागे टाकला.

आता न्यूझीलंडविरुद्ध सामना: भारतीय संघानं २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतानं आतापर्यंत ग्रुप स्टेजमधील 8 पैकी सर्व 8 सामने जिंकले आहेत. त्याचा उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी चमकदार राहिली आहे. त्यामुळे आगामी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोहलीच नंबर १! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकातून बाहेर पडलेल्या ६ संघांची कामगिरी कशी राहिली, जाणून घ्या
  3. Cricket World Cup 2023 : भारताची दिवाळी गोड, नेदरलॅंडचा १६० धावांनी पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details