महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Cancer Day 2023: आज जागतिक कर्करोग दिवस! वाचा, काय आहे 'केअर गॅप बंद करा' थीम

जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे.तर जाणून घ्या जागतिक कर्करोग दिनाची इतिहास, तारीख आणि थीम काय आहे.

By

Published : Feb 4, 2023, 9:56 AM IST

World Cancer Day 2023
कर्करोग दिन 2023

मुंबई: युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने जागतिक कर्करोग दिन हा, एक जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन कर्करोग रोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, तसेच या आजारावर मात करून पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा बाळगणार्‍यांच्या उत्साहाला बळकटी देण्याचा देखील आहे.

जागतिक कर्करोग दिनाची थीम: जागतिक कर्करोग दिन 2022-2024 ची थीम केअर गॅप बंद करा अशी आहे. युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या दिवसाच्या नियोजनाची जबाबदारी घेते. जागतिक आरोग्य संघटना कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी एक मॅन्युअल तयार केले आहे. निःसंशयपणे, लवकर कर्करोगाचा शोध घेतल्यास कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, परंतु भारतीयांना फुफ्फुस, स्तन, गर्भाशय ग्रीवा, मान, मेंदू आणि कोलोरेक्टल या कर्करोगाचा सर्वाधिक त्रास होतो.

कर्करोग दिनाचा इतिहास: जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात 2000 मध्ये पॅरिस येथे झालेल्या कर्करोगाविरुद्धच्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेत करण्यात आली. या शिखर परिषदेत पॅरिस अगेन्स्ट कॅन्सरच्या चार्टरवर जगातील विविध भागांतील अनेक राष्ट्रप्रमुख आणि कर्करोग संस्थांनी स्वाक्षरी केली. सनदच्या कलमामध्ये 4 फेब्रुवारी हा दिवस औपचारिकपणे जागतिक कर्करोग दिन म्हणून नोंदवण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की, 2040 पर्यंत, कर्करोगाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत राहिल्यास जगभरात 16.3 दशलक्षाहून अधिक कर्करोगाशी संबंधित मृत्यू होतील. याव्यतिरिक्त, डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की, कर्करोगाशी संबंधित 40% मृत्यू टाळले जाऊ शकते

कर्करोग करतो स्वतःचे नियंत्रण:कर्करोग वेगाने वाढतो. केमोथेरपीच्या आणि रेडिओथेरपीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची यंत्रणा उभी करतो. ट्युमरला रक्तपुरवठा होत नसेल तर स्वतः रक्तवाहिनींना जोडणारे जाळे तयार करतो. केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा सर्जरी करूनसुद्धा कणभर जरी ट्युमर शिल्लक असेल तर पुन्हा तो शून्यातून उभारी घेत असतो. एका अवयवाचा कर्करोग बरा झाला, असे वाटत असते तेव्हाच तो दुसऱ्या कोणत्या तरी अवयवामध्ये पसरलेला असतो. शरीरामध्ये जसा मेंदू सर्व अवयवांचे नियंत्रण करतो तसेच कर्करोगसुद्धा स्वतःचे नियंत्रण करतो. या सर्व कारणामुळे कर्करोग नियंत्रणात येत नाही.

का होतो कर्करोग?:शरीरातील गुणसूत्र बदलामुळे असामान्यपणे अमर्याद वाढणारे पेशीसमूह आणि त्याच्यामुळे होणार आजार म्हणजे कॅन्सर. हे हिप्पोक्रेटिस या ग्रीक विचारवंताने सर्वात प्रथम इसवीसन पूर्व ३७० मध्ये जगासमोर आणले. तेव्हापासून कर्करोगाने मानवाची पाठ सोडलेली नाही. जवळपास ३५०० वर्षांपासून कर्करोग समजून घेण्याचा, त्यावर निदान आणि उपचार पद्धती शोधण्यासाठी मानवाने खूप संघर्ष केला आहे आणि आजही चालूच आहे.

तंबाखूमुळे कर्करोग:कर्करोगाचा काही पुरावा प्राचीन इजिप्तमधील मानवी ममींमध्ये जीवाश्‍म झालेल्या हाडांच्या सांगाड्यातही सापडतो. जवळजवळ प्रत्येक काळात कर्करोगाचे निदान त्याच्या दृश्‍यमान चिन्हे आणि लक्षणांवरून तसेच नंतरच्या टप्प्यावर रुग्णाची अवस्था यावरुन केले गेले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे आठराव्या शतकात कर्करोगासाठी शस्त्रक्रियेचा प्रयोग करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरवातीला रेडिओथेरपी आणि १९६० नंतर किमोथेरपीचा प्रयोग सुरु झाला. सन १८७०च्या आसपास ब्रिटिश डॉक्‍टर क्‍लिनियन जॉन हिलने तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे शोधून काढले. त्यानंतरच्या दीडशे वर्षात इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असे दिडशेहून अधिक रसायनिक आणि जैविक पदार्थ शोधून काढले आहेत.

हेही वाचा:World Cancer Day 2023 यावर्षी जागतिक कर्करोग दिन साजरा होतोय केअर गॅप बंद करा थीमवर वाचा कर्करोग रोखण्यासाठीच्या उपाययोजना

ABOUT THE AUTHOR

...view details