मदुराई (तामिळनाडू) -मदुराईतून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. येथील शासकीय शाळेतील महिला शिक्षिकेला ( Woman teacher sexually abused school boys ) ट्यूशनमधील शाळकरी मुलांवर लैंगिक शोषण केल्याच्या कारणातून अटक करण्यात आली आहे. ती तिच्या स्वतःच्या मुलासह किशोरवयीन मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा -Unique Village : गावात शाळा नाही, तर शाळेतच गाव! वाचा मध्यप्रदेशातील गावाचा अनोखी उपक्रम
मदुराईच्या बेथानियापुरम भागातील ४५ वर्षीय महिला मदुराई - शिवगंगाई जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ती तिच्या पतीपासून विभक्त झाली होती आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या तिच्या मुलाबरोबर राहात होती. तिच्याकडे शाळांमधील उच्च वर्गांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ट्यूशनला आहे. 16 आणि 18 वर्षे वयोगटातील 2 विद्यार्थ्यांसोबत ही महिला शिक्षक आक्षेपार्ह स्थितीत असातनाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. सध्या या शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी महिला शिक्षिकेसह अजून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि सेल फोन जप्त करण्यात आले आहेत. मदुराई नगर येथील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी शिक्षिकेचा मोबाईल, एक लॅपटॉप आणि संगणक जप्त केला आहे. त्यात 50 हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. त्याचबरोबर, शिक्षिकेसोबत शिकवणीला शिकणाऱ्या 10 हून अधिक विद्यार्थ्यांची पोलीस गुप्तपणे चौकशी करत आहे.
हेही वाचा -'तो' देवदूतासारखा आला आणि चौघांचे प्राण वाचवले; मुख्यमंत्री गेहलोत यांनी केले अभिनंदन