महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Woman Killed Boyfriends Slitting Throat : बॉयफ्रेंडचा गळा चिरून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला, महिलेला अटक - Woman Killed Boyfriends Slitting Throat

गाझियाबादच्या तुलसी निकेतन परिसरात एका महिलेला तिच्या लिव्ह इन पार्टनरच्या (Live-in Partner) हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रियकराची गळा चिरून हत्या केल्यानंतर ( Woman Killed Boyfriends Slitting Throat ) ही महिला मृतदेह सुटकेसमध्ये लपवून ठेवत असताना पोलिसांनी तिला पकडले.

Woman Killed Boyfriend
Woman Killed Boyfriend

By

Published : Aug 9, 2022, 11:55 AM IST

नवी दिल्ली/गाजियाबादःजिल्ह्यातील तिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसी निकेतन परिसरात प्रियकराची गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी ( Woman Killed Boyfriends Slitting Throat ) एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रीती शर्मा असे या महिलेचे नाव आहे, तर तिचा लिव्ह इन पार्टनर (Live-in Partner) फिरोज हा संभलचा रहिवासी आहे. या महिलेला प्रियकराची हत्या केल्यानंतर ती मृतदेह एका सुटकेसमध्ये कोंबून घेऊन जात असताना पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

महिलेने तरुणावर लग्नासाठी दबावटाकला होता. मात्र, तरुणाने त्यास नकार दिला होता. यानंतर महिलेने तरुणाचा वस्तऱ्याने गळा चिरून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने दिल्लीतील सीलमपूर येथून एक मोठी सुटकेस आणली होती. त्यात मृतदेह टाकून ती घेऊन जात असताना पोलिसांना महिलेचा संशय आला. पोलिसांनी सुटकेसची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

प्रीती शर्मा पती दीपकला सोडूनगेल्या ३ ते ४ वर्षांपासून फिरोजसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिला फिरोजसोबत लग्न करायचे होते, पण फिरोजने नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतर प्रितीने फिरोजची हत्या केली. फिरोज दिल्लीत हेअर ड्रेसरचे काम करत असे. काही लोक सोशल मीडियावर याला लव्ह जिहादचे प्रकरण देखील म्हणत आहेत, ज्यामध्ये प्रेयसीने रक्तरंजित बदला घेतला आहे.

हेही वाचा -मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड!

ABOUT THE AUTHOR

...view details