बेंगळुरू (कर्नाटक): Bengaluru Airport: बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIAL) सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला प्रवाशाला तिचा शर्ट काढायला लावल्याची घटना समोर आली Woman Forced To Strip For Security Check आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त केला आहे आणि ऑपरेशन टीमकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. Security Check At Bengaluru Airport
क्रिशानी गाढवी असे पीडित महिलेने मंगळवारी संध्याकाळी तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सुरक्षा तपासणीदरम्यान बेंगळुरू विमानतळावर शर्ट काढण्यास महिलेला सांगण्यात आले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला. सुरक्षा चौकीवर फक्त छोटे कपडे घालून उभे राहणे खरोखरच अपमानास्पद होते. एक स्त्री म्हणून, लोकांनी तुम्हाला असे पाहावे असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. तुम्हाला महिलांनी कपडे काढण्याची गरज का आहे?, असे तिने ट्विटरवर म्हटले आहे. कृष्णानी मात्र तिच्या प्रवासाच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तिने स्वतःचे वर्णन एक विद्यार्थिनी आणि संगीतकार असे केले. Bengaluru Airport allegation
बेंगळुरू विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले की, "झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमस्व आणि असे घडायला नको होते." आम्ही आमच्या ऑपरेशन टीमसमोर ही बाब मांडली आहे आणि हे प्रकरण CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ला देखील कळवण्यात आले आहे. तथापि, CISF कडे तक्रार करण्याऐवजी पीडितेच्या सोशल मीडियावर निवेदन करण्याच्या हेतूवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.